मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्राचा मार्ग खुला झाला. याच गॅझेटचा आधार घेत आता बंजारा समाजानेही आपली आरक्षणाची मागणी उचलून धरली आहे. सध्या विमुक्त व भटक्या जमाती (व्हीजेएनटी-ए) प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ८ सप्टेंबर रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत धर्मगुरू, महंत, आमदार, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक उपस्थित राहणार असून आंदोलन, कायदेशीर लढाई आणि पुढील रणनीती यावर चर्चा होणार आहे.…
Author: सत्यदिशा न्युज
भारतीय संस्कृतीत दूध हे केवळ पेय नाही तर आरोग्याचा स्रोत मानले जाते. आणि त्यात जर हळद मिसळली तर ते औषधापेक्षा कमी नाही. आजी-आजोबा नेहमी मुलांना झोपण्यापूर्वी दूध पिण्यास सांगायचे, आणि हळद घालून पिल्यास त्याचे फायदे कितीतरी पटींनी वाढतात. हा परंपरागत सल्ला आजही तितकाच उपयोगी आहे. हळदीच्या दुधाचे अद्भुत फायदे १) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हळदीतील करक्यूमिन हे सक्रिय घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे मोसमी आजार सहज टाळता येतात. २) त्वचेचा तजेलपणा वाढवते हळदीच्या दुधात असणारे अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या समस्या कमी करतात. पिंपल्सवर परिणामकारक ठरतात आणि त्वचेला उजळपणा देतात. ३) गाढ झोप येण्यासाठी उपयुक्त रात्री…
पुणे | प्रतिनिधी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. नुकताच हा दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. पूर्वी शिक्षणाची पद्धत वेगळी होती. शिक्षक बडवून विद्यार्थ्यांना शिस्त लावत, पाढे पाठ करून घेत असत. पण आजच्या काळात कॅल्क्युलेटर, इंटरनेट, यूट्यूब, गुगल आणि चॅट जीपीटी यांसारख्या साधनांमुळे विद्यार्थी त्वरित उत्तरे मिळवू लागले आहेत. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांची व्याख्याच बदलली आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार झाला आणि पारंपरिक शिक्षणपद्धतीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला. आता कुठलीही शंका असो किंवा गृहपाठ असो, गुगल आणि विविध डिजिटल…
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) जगाच्या कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल घडवत असून पुढील काही वर्षांत लाखो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा इशारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिला आहे. मात्र, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित राहतील याविषयी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी महत्त्वाचे मत मांडले. ते म्हणाले की पुढील १०० वर्षांपर्यंत एआय कोडिंग, जीवशास्त्र आणि ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्या हिरावून घेऊ शकणार नाही. 🔹 कोडिंग: कोडिंग हे फक्त टायपिंग नसून सर्जनशील विचारांची कला आहे. एआय साधे काम करू शकते, पण नवोपक्रम आणि सर्जनशील विचार मानवाच्याच हातात राहतील. 🔹 जीवशास्त्र: एआय संशोधनाला गती देऊ शकते, पण नवे सिद्धांत मांडणे व नवे शोध लावणे हे मानवी सर्जनशीलतेवरच अवलंबून राहील.…
पुणे (भोसरी) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडमधील दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) व भाची कादंबरी गादेकर (वय १८, रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला. घटनेचा तपशील भोसरी येथे राहणारे कृष्णा आंबटवार हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. ते आपल्या पत्नी प्रतिभा आंबटवार व सात वर्षांच्या मुलीसोबत वास्तव्यास होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी प्रतिभा आंबटवार व त्यांची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. दरम्यान, विसर्जन मार्गावरील…
⚔️ सुव्यवस्थित सैन्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य टिकवून ठेवण्यामागे त्यांचे सैन्य हेच मुख्य बळ होते. त्यांच्या लष्करात दोन प्रमुख विभाग होते: पायदळ – घाटमाथ्याचे मावळे तलवारबाजीत पारंगत, तर कोकणातील शेतकरी नेमबाजीत कुशल. घोडदळ – महाराज स्वतः घोडेस्वारांना घोडे पुरवत व देखरेखीसाठी खिदमतगार नेमत असत. 🐎 घोडदळाचा खर्च इंग्रजी साधनांनुसार महाराजांचे घोडदळ तब्बल ५०,००० घोडेस्वारांचे होते. प्रत्येक घोडेस्वाराला वार्षिक ९६ ते १२० रुपये पगार मिळत असे. त्यामुळे घोडदळाचा वार्षिक खर्च तब्बल ४८ लाख ते ६० लाख रुपये होत असे. घोड्यांचे खाद्य, काळजी आणि खिदमतगारांचा खर्च हा वेगळाच. 👣 पायदळाचा खर्च पायदळ सैनिकांचा पगार घोडेस्वारांच्या पगाराच्या निम्मा होता. तरीही, त्यांच्या संख्येमुळे…
दि. ७ सप्टेंबर : वर्ष २०२५ मधील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण रात्री ९:५७ वाजता सुरू होऊन ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपणार आहे. या काळात ग्रहणाचा स्पर्शकाल रात्री ११:०९, मध्यकाल रात्री ११:४२, तर मोक्षकाल पहाटे १:२३ असेल. हे चंद्रग्रहण जवळपास ४ तास चालणार आहे. 🔭 ग्रहण कुठे दिसेल? भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हे ग्रहण दिसणार असून, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगलुरू, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ व चंदीगड या प्रमुख शहरांमध्ये हे ग्रहण स्पष्टपणे पाहता येईल. याशिवाय युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, आर्क्टिक, अमेरिका तसेच पॅसिफिक व अटलांटिक महासागर प्रदेशातही…
थेऊर, ता. ७ : शादी डॉट कॉमवर ओळख करून महिलेला फसवून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एका लॉजमध्ये घडली आहे. हा प्रकार २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, रा. चाकण) याने पतीपासून अलिप्त राहणाऱ्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साइटवर ओळख करून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला एकांतात बोलावून लॉजवर नेले व तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढेच नव्हे तर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकावल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित २५ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.…
पुण्यातील पोलिसांची मोठी कारवाई पुणे | फिरोज शेख गणेशोत्सव काळात दहशत माजविण्याचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. अंमळदारसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरमागे, चाल नं.१३, दत्तवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.काय जप्त झाले?३५,८०० रुपयांचे देशी बनावटीचेपिस्तुल२ जिवंत काडतुसे पोलिसांची माहिती गोपनीय बातमीवरून पोलिसांनी संशयिताला अडवून झडती घेतली असता, त्याच्याकडून पिस्तुल व काडतुसे सापडली. तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोण होते कारवाईत पुढाकार घेणारे अधिकारी?ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार…
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा समाजाचे ओबीसीकरण करणं चालू असेल तर भटके विमुक्त, लहान लहान जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि हा डाव सरकारने साधलेला आहे. यामुळे आता ही लढाई पुन्हा ओबीसी आणि मराठा, ओबीसी विरुद्ध सरकार अशी चालूच राहणार आहे. यातून फार मोठा अन्याय ओबीसी समाजावर झाला आहे.’, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ…