Author: सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

भंडारा : जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने प्रेमसंबंधात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलगे आणि एका अल्पवयीन मुलीवर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर चौघेही एकाच शाळेत शिकलेले असून, दहावीपर्यंत ते वर्गमित्र होते. शाळा बदलूनही बारावीच्या ट्यूशनमुळे त्यांचा संपर्क कायम राहिला. या काळात एका मुलाचा त्याच्याच वर्गमैत्रिणीकडे कल वाढला. त्याने मुलीचा पिच्छा पुरवणे, पाठलाग करणे आणि प्रेमसंबंधांसाठी दबाव आणणे सुरू केले. त्याला इतर तिघांनीही मदत केली, असा आरोप आहे. सततच्या त्रासामुळे पीडित मुलगी मानसिक तणावाखाली गेली. इतकेच नव्हे तर तिने आत्महत्येचा विचारही केला. मात्र तिने योग्य वेळी आपल्या आई-वडिलांशी हकीकत…

Read More

राजस्थानमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील 37 वर्षीय अंगणवाडी पर्यवेक्षक मुकेश कुमारी हिने तिच्या प्रियकराशी लग्नाचा आग्रह धरला, पण दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिच्याच कारमध्ये सापडला. या प्रकरणी प्रियकर मनाराम (शाळेतील शिक्षक) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमारी आणि मनारामची ओळख गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकवर झाली होती. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मुकेश आपल्या पतीपासून विभक्त होती, तर मनारामचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. 10 सप्टेंबर रोजी मुकेश झुंझुनूहून बाडमेरला कारने 600 किमी प्रवास करत मनारामला भेटायला पोहोचली. तिने त्याच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल सांगितल्याने मनाराम संतापला. पोलिसांनी समुपदेशन करून त्यांना चर्चा करण्यास सांगितले होते.संध्याकाळी दोघे एकत्र असताना…

Read More

राजस्थानमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील 37 वर्षीय अंगणवाडी पर्यवेक्षक मुकेश कुमारी हिने तिच्या प्रियकराशी लग्नाचा आग्रह धरला, पण दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिच्याच कारमध्ये सापडला. या प्रकरणी प्रियकर मनाराम (शाळेतील शिक्षक) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमारी आणि मनारामची ओळख गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकवर झाली होती. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मुकेश आपल्या पतीपासून विभक्त होती, तर मनारामचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. 10 सप्टेंबर रोजी मुकेश झुंझुनूहून बाडमेरला कारने 600 किमी प्रवास करत मनारामला भेटायला पोहोचली. तिने त्याच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल सांगितल्याने मनाराम संतापला. पोलिसांनी समुपदेशन करून त्यांना चर्चा करण्यास सांगितले होते.संध्याकाळी दोघे एकत्र असताना…

Read More

नाशिक : ‘हैद्राबाद गॅझेट’च्या अंमलबजावणीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर थेट टीका केली. नाशिकमधील कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारची भूमिका अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.🔹 आरक्षणाबाबत सरकारचा दृष्टिकोन अस्पष्ट पवार म्हणाले, “हैद्राबाद गॅझेट मी शब्दशः दोनदा वाचले आहे. त्यात फक्त शेतकऱ्यांना सवलत नाही, तर व्हीजेएनटी आणि बंजारा समाजाला आदिवासी दर्जा देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या समाजांतून नवी मागणी पुढे आली आहे. त्याचवेळी आदिवासी समाजाने मात्र आमच्या कोट्यात हात घालू नका, असा इशारा दिला आहे.”🔹 दोन समित्यांवर प्रश्नचिन्ह राज्य सरकारने बावनकुळे समिती (ओबीसींसाठी) आणि…

Read More

लोणी काळभोर प्रतिनिधी :बापु फुंदे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि फुरसुंगी गावांमध्ये रविवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला. ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, कदमवाकवस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने शेततळ्यांचे स्वरूप निर्माण झाले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राहत्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांनी रात्रभर डोळ्यांत तेल घालून जागरण केले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या तिन्ही गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झाले असून, खाजगी विकासकांनी ओढे बुजवणे किंवा त्यांची रुंदी कमी करणे यामुळे जलनिस्सारण व्यवस्थेला…

Read More

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य ठरवली आहे. त्यामुळे राज्यातील ५२ वर्षांखालील सर्व शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. या निकालावर महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, राज्यातील हजारो शिक्षकांनी २३ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी २०१३ पासून नव्या शिक्षक भरतीसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, त्याआधी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शिक्षकांना परीक्षा देणे बंधनकारक आहे. न्यायालयाने दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली असून, अपयशी ठरल्यास सक्तीची सेवानिवृत्ती करण्याचाही इशारा दिला आहे. यामुळे…

Read More

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला. मात्र, या जीआरला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत असून, “मराठा समाजाला ओबीसीमधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्या” अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिंगारवाडी फाटा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद पेटला आहे. या वक्तव्यावर मराठा समाज आक्रमक झाला असून, हाके यांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हाके यांच्या विरोधात गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा…

Read More

“मृत्यूच्या दारेवर” उभा राहून जीवन बदलले — डॉ. राजीव पारतींचा निअर-डेथ अनुभव आणि त्यातून आलेला निसारांश: प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारादरम्यान 2008 मध्ये काही काळ हृदय थांबल्याने निअर-डेथ अनुभव आलेल्या डॉ. राजीव पारतींनी वैद्यकीय पद, संपत्ती आणि भौतिक सुखांचा त्याग करून जीवनाचा प्रवासच बदलला — हा त्यांचा अनुभव आता पुस्तकात आणि त्यांच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. डॉ. राजीव पारती — जेव्हा वैद्यकीय जगतातील प्रतिष्ठित एनेस्थेसियोलॉजिस्ट होते — त्यांच्या आयुष्यातला एक क्षणच संपूर्ण जीवनासाठी निर्णायक ठरला. 2008 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारादरम्यान त्यांचे हृदय काही काळासाठी थांबले. त्या काळात त्यांना अस्वल वेदना, धूर, जळणाऱ्या मांसाचा वास आणि “नरकाच्या तोंडाशी” उभे असल्याचा भास झाल्याचे…

Read More

पुणे :   धक्कादायक घटनेत, ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा बॉसकडे आजारपणामुळे Sick Leave मागितल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. कर्मचारी शंकर (वय ४०) याने पाठदुखीमुळे कामावर येऊ शकत नसल्याचं आपल्या वरिष्ठांना मेसेज केला होता. त्यावर बॉसनं “ठीक आहे, आराम कर” असं उत्तर दिलं. पण काही मिनिटांतच शंकरला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वरिष्ठ के. व्ही. अय्यर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. “तो सहा वर्षे माझ्या टीमचा भाग होता. निरोगी, तंदुरुस्त होता. विवाहीत असून त्याला एक मुलगा आहे. त्याचं अचानक जाणं आम्हाला स्वीकारणं कठीण आहे,” असं त्यांनी…

Read More

मुंबई : राज्यातील शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हते. परिणामी, शिक्षकांचे मोठे नुकसान होत होते.मात्र, अखेर एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.🔹 राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडश्रेणी लागू होते. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणादरम्यान आणि त्यानंतर चाचण्या होतात. चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतरच वेतनश्रेणीत बदल होतो. यंदा प्राथमिक,…

Read More