Author: सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गावर नियुक्त असलेल्या आणि वय ५२ वर्षांपर्यंत असलेल्या सर्व शिक्षकांना पुढील दोन वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांवर सक्तीची सेवानिवृत्ती लादली जाणार असल्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेले अनेक शिक्षक या आदेशामुळे चिंतेत आले आहेत. कारण त्या काळी भरती प्रक्रिया डीएडच्या गुणांवर आधारित होती आणि टीईटीची अट नव्हती. तर २०१३ नंतर मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की शिक्षक डीएड किंवा बीएड झालेले आहेत का, यापेक्षा…

Read More

पुणे संपादक; बापु फुंदे – नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर याने मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आंदेकर टोळीचा कुख्यात चेहरा मानला जाणारा कृष्णा आंदेकर हा दिवंगत बंडू आंदेकर याचा मुलगा आणि वनराज आंदेकरचा भाऊ आहे. काय आहे प्रकरण? आयुष कोमकर याची नाना पेठेत ९ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोमकरवर गोळीबार करून आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेतल्याचे उघड झाले होते. या कटाचा मास्टरमाइंड म्हणून कृष्णा आंदेकरचे नाव पुढे आले होते. आंदेकर कुटुंबाची पार्श्वभूमी बंडू आंदेकरने पुण्यातील गुन्हेगारी आणि ठेकेदारीवर दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. त्याच्या मुलांनी…

Read More

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीमुळे पुन्हा एकदा २३ मार्च १९९४ चा जीआर चर्चेत आला आहे. मराठा आंदोलनकर्ते कुणबी- मराठा एकच असल्याचे ऐतिहासिक पुरावे देत आहेत, तर ओबीसी नेते मात्र मराठा समाज मागास नसल्याचा दावा कोर्ट निर्णय आणि आयोगाच्या अहवालांच्या आधारे करत आहेत. या वादात पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव पुढे येत असून, मराठा समाज आरक्षणाबाहेर राहण्यास पवार जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. २ सप्टेंबर २०२५ चा जीआर रद्द करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि…

Read More

पुणे संपादक: बापु फुंदे  करंजेपूल बसस्टॉप परिसरात वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई – दोन महिलांची सुटका बारामती तालुक्यातील करंजेपुल परिसरात वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोठी कारवाई करत पैशाचे आमिष दाखवून दोन महिलांना जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपींकडील स्विफ्ट कारसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.अटक झालेल्या आरोपींची नावे सुयोग हिंदुराव खताळ व प्रीतम आप्पासाहेब घुले (दोघे रा. कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याकडील स्विफ्ट कार (क्र. एमएच 11 एमडी 8055) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांना कसा लागला सुगावा? पेट्रोलिंग दरम्यान करंजेपुल बसस्टॉप परिसरात लाल रंगाची…

Read More

पुणे संपादक: बापु फुंदे करमाळा तालुक्यतील विविध भागांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, कांदा, मका, ऊस आणि तुर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. अशा ठिकाणी महसूल खात्याने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सीना नदी काठावरील आळजापूर, तरटगाव, निलज, बोरगाव, संगोबा, करजे, मिरगव्हाण ही गावे पाण्याच्या धोक्याखाली आली होती. परिस्थिती गंभीर बनल्याचे लक्षात घेऊन करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच प्रशासनाने तत्काळ कारवाई करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही केली. जरी मोठा जीवितहानीचा…

Read More

कल्लाकुरिची (तमिळनाडू) : अनैतिक संबंधांच्या घटनांमुळे पती-पत्नीतील वाद वाढताना दिसत आहेत. अशाच एका प्रकरणाने संपूर्ण तमिळनाडू हादरले आहे. पत्नीच्या परपुरुषाशी संबंधाचा संशय घेऊन संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा छतावरच निर्घृण खून केला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांची मुंडकी छाटून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. मृत महिला लक्ष्मी आणि तिचा प्रियकर थंगाराससु यांना आरोपी पती कोलांजीने धारदार शस्त्राने ठार केले. घटनेनंतर कोलांजीने दोघांची डोकी पिशवीत भरून दुचाकीला बांधली आणि थेट वल्लोर मध्यवर्ती कारागृहात जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. लक्ष्मी आणि कोलांजीला तीन मुली असून, या घटनेनंतर त्या मुलींना नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलीस…

Read More

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता आयोगाला या मुदतीत निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार-पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे लांबणीवर पडत होत्या. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवत निवडणूक आयोगाला चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कर्मचारी कमतरता, ईव्हीएमची उपलब्धता, सण-समारंभ अशी विविध कारणे पुढे करत आयोगाने मुदतवाढ मागितली होती.…

Read More

पुणे संपादक:  बापु फुंदे “दीड वर्षात तीनपट परतावा” देण्याचं गोड आश्वासन देत ब्लॅक औरा नावाच्या कंपनीने बारामतीत अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून गुंतवणूक करायला भाग पाडून नंतर वेबसाईट बंद करून गुंतवणूकदारांना अक्षरशः ससेहोलपट सोसावा लागला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बारामतीतील नामांकित हॉटेलमध्ये खास सेमिनार घेण्यात आले. “लक्झरी आयुष्याचा पासपोर्ट” म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणुकीसाठी भाग पाडलं. स्थानिक प्रतिनिधींकडून भूपेंद्र मनी ट्रान्सफर नावाच्या खात्यावर लाखोंची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आली. रक्कम जमा झाल्यानंतर कंपनीकडून वेबसाईटवर “वाढती गुंतवणूक” दाखवण्यात आली. काही काळानंतर अचानक ही वेबसाईट बंद पडली. प्रतिनिधींनी “दोन दिवसात सुरू होईल” अशी दिलासा देणारी उत्तरे…

Read More

गुवाहाटी : “देशाची सेवा करायची आहे” असं उत्तर देऊन नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचे वेगळेच कारनामे समोर आले आहेत. आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (ACS) मधील 2019 बॅचची अधिकारी नुपूर बोरा हिच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 2 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या दक्षता पथकाने सोमवारी गुवाहाटीतील तिच्या अधिकृत निवासस्थानावर छापा टाकला. त्यात 90 लाख रोख रक्कम आणि 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने मिळाले. या आकड्यांनी व्हिजिलन्स टीमलाही चकित केले.सहा महिन्यांपासून रडारवर नुपूर बोरा हिच्या हालचालींवर गेल्या सहा महिन्यांपासून देखरेख सुरू होती. बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून काम करताना तिने संशयित…

Read More