निलंगा (ता. 20) : निलंगा-औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (ता. 18) सकाळी 11.55 वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हबीब हसन शेख (वय 32, रा. शेडोळ, ता. निलंगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीब शेख हे मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच हबीब शेख हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 24 एव्ही 0309) निलंग्याकडे निघाले. निंबाळकर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते बाहेर पडत असतानाच औसा मार्गावरून निलंग्याच्या दिशेने वेगात येणाऱ्या निलंगा-लातूर एसटी बसने (एमएच 13 सीयू 8653) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक…
Author: सत्यदिशा न्युज
लातूर : कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे भीषण रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. लातूर शहरातील वस्ताद लहुजी साळवे चौकाजवळ बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. बार्शी रोडवरून औसा रोडमार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या इर्टिगा कार चालकाने क्रूझर जीपला कट मारला. याचा राग अनावर झाल्याने क्रूझर चालकाने जीप कारसमोर आडवी लावली. यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळला आणि लाथा-बुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. दरम्यान, क्रूझरमधील एका आरोपीने जवळचा चाकू काढून इर्टिगा कारमधील तरुणावर सपासप वार केले. तरुण ठार, महिला गंभीर जखमी या हल्ल्यात अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचा जागीच मृत्यू…
नळदुर्ग; माननीय माजी नगराध्यक्ष शहाबाज काजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री धीरज भैया पाटील तसेच अरविंद बेडगे साहेबांचे विश्वासू स्वामी उपस्थित राहून काजी साहेबांचा सत्कार करण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमाला नळदुर्ग नगरीचे नगरसेवक इमाम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात काजी साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. काजी साहेबांच्या नेतृत्वगुणांचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे संपादक : बापु फुंदे वाहतूक कोंडी, दुचाकीस्वारांचे मृत्यू या लौकिकाबरोबरच आता पादचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूंनी पुणे शहराची प्रतिमा आणखी चिंताजनक झाली आहे. या वर्षीच्या (जानेवारी ते जुलै) पहिल्या सात महिन्यांत तब्बल ६० पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक तीन ते चार दिवसांनी एक पादचारी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतोय. २०२४ मध्ये पुण्यातील रस्ता अपघातांत एकूण ३२० मृत्यू नोंदवले गेले होते, त्यातील मोठा वाटा पादचाऱ्यांचा होता. रस्त्यांवरील मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाहनचालकांची बेफिकिरी यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडच्या दोन दिवसांत झालेल्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. लोहगावमधील हवाई दलाच्या वसाहतीत दोन वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव मोटारीने चिरडले. शिवाजी रस्त्यावरील…
पुणे संपादक: बापु फुंदे पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. नारायण शाहूराज सूर्यवंशी (वय 36) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा नातेवाईक किरण रमेश कात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, रिक्षाचालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळी न थांबता पसार झाला. हडपसर पोलिसांनी 796/2025 भा.न्या.सं.क. 106 (1), 125 (ब), 281, मो.वा.का.क. 184, 119/177 नुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध पोलिसांकडून…
पुणे संपादक: बापु फुंदे मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे थेऊर परिसरात (ता. हवेली) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतमाल व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण करून पूरस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी : प्रसादराव दत्ताजीराव पाटील दिलीप कुंजीर दत्तात्रय महादेव चव्हाण सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) गोविंद जिवन उत्तमचंदानी राजेश जीवन उत्तमचंदानी (दोघेही रा. सिस्का हाऊस, लोहगाव, पुणे) या प्रकरणी लोणी काळभोरचे ग्राम महसूल अधिकारी अर्जुन…
पुणे संपादक बापु फुंदे लोणी काळभोर, थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात शनिवारी (ता.13) दुपारी प्लॉटिंगमध्ये मजुरी करणाऱ्या कामगाराला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत मजूर गंभीर जखमी झाला असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मजुराचे नाव सागर शंकर इंगळे (वय 40, रा. काळे वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. तर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे हे प्लॉटिंगमध्ये मजुरी करत असताना समीर व मनिषा पाचोरकर यांनी घटनास्थळी येऊन त्यांना शिवीगाळ केली. “येथे…
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेला नैसर्गिक नरमाधी धबधबा सध्या पावसाळ्याच्या आगमनाने पर्यटकांना मोहून टाकत आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याला भरपूर पाणी मिळाले असून पांढऱ्या फेसाळलेल्या पाण्याचा माऱ्यासह निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. सप्ताहअखेरीस व सुट्टीच्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. किल्ल्याच्या प्राचीन वास्तुकलेसोबतच वाहत्या पाण्याचा गडगडाट आणि हिरव्यागार निसर्गाची सांगड पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देत आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना देखील या पर्यटनामुळे चांगला फायदा होत आहे. प्रशासनाने मात्र पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नळदुर्ग किल्ला आणि नरमाधी धबधबा हे पावसाळ्यात पाहण्यासारखे पर्यटनस्थळ ठरत असून, सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व फोटो व्हायरल होत…
पुणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात पहिल्यांदाच डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस दाखल झाली असून लवकरच या बसेस पुण्याच्या रस्त्यांवर धावणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या या बसांची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. स्विच मोबिलिटी कंपनीने तयार केलेल्या या बस आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून पूर्णपणे वातानुकूलित (एसी) आहेत. वैशिष्ट्ये : बसची क्षमता : 60 प्रवाशांसाठी बसण्याची व 25 प्रवाशांसाठी उभे प्रवास करण्याची सुविधा. आकारमान : लांबी 9.5 मीटर, रुंदी 2.6 मीटर आणि उंची 4.75 मीटर. किंमत : प्रत्येकी बस जवळपास 2 कोटी रुपये. सुविधा : आरामदायी आसनव्यवस्था, वेगवान…
‘एसटी’ आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक सोलापूर : बंजारा समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज सोलापुरात हजारो समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. नेहरूनगर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. पारंपरिक बंजारा वेशभूषेत महिला, बैलगाड्या आणि युवकांच्या घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला होता. “आरक्षण आमच्या हक्काचे… जय सेवालाल!” या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले. बंजारा समाजाचा दावा आहे की ‘हैदराबाद गॅझेट’नुसार ते एसटी प्रवर्गात मोडतात; परंतु महाराष्ट्रात त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यभर आंदोलन पेटले असून, सोलापुरात या आंदोलनाने आज जोर धरला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. “सरकारने तातडीने आमची मागणी मान्य…