Author: सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

कुंजीरवाडी (ता. हवेली) – धुमाळ मळा परिसरात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे काशिनाथ शंकर भोंडवे व शिवराम काशिनाथ भोंडवे (रा. गट नं. ३८९, धुमाळ मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत. महावितरणच्या मुळशी विभागातील उपकार्यकारी अभियंता दिप्ती पाटील यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक तपासणीसाठी गेले असता, भोंडवे यांच्या घरातील मीटरचे सील तोडून छेडछाड केल्याचे आढळले. तपासात ग्राहकाने मीटरच्या सर्किटमध्ये रेझिस्टन्स बसवून तब्बल ८७ महिन्यांपासून १३,०२६ युनिटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या चोरीमुळे महावितरणला २,२८,९२१ रुपयांचे नुकसान झाले…

Read More

नाशिकमध्ये पूर्वनियोजित कट रचून एका तरुणाची कोयता आणि चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृतदेहावरून नातेवाइकांनी संताप व्यक्त करत आक्रोश केला.

Read More

पनवेल – पनवेल शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना करंजाडे सेक्टर ७ मध्ये घडली आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाचीच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री ८.३७ वाजता घडली. घटनेनंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मृताचे नाव दत्तू असून आरोपी नागेश (२८) हा त्याचा सख्खा भाऊ आहे. प्राथमिक चौकशीत उघड झाले की, दत्तूचे आपल्या चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून दत्तू आणि नागेश यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात नागेशने दगडाने दत्तूच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी दत्तूचा मुलगा…

Read More

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व ३० हजार रुपये रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मंगेश तुकाराम मोहिते (वय २९, रा. प्रथमेश अपार्टमेंट, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २०) कुटुंबासह वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या मोहिते कुटुंबीयांना सोमवारी सकाळी घरी परतल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता कपाट व लॉकर फोडून त्यातील सोन्याचे नेकलेस, कर्णफुले, तीन अंगठ्या, तीन नथ, छल्ला, पैंजण, चांदीची चैन, तीन चांदीच्या अंगठ्या तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम असा लाखोंचा…

Read More

१२ किलो गांजासह रिक्षा जप्त, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत पुणे – उरुळी कांचनकडून निगडीकडे रिक्षातून गांजा वाहतूक करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा आणि रिक्षा असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे रिक्षाचालकाचे नाव असून, गांजा घेणारा मात्र पसार झाला आहे. कारवाई कशी उलगडली? २१ सप्टेंबर रोजी पोलिस अंमलदार राहुल कर्डिले यांना गांजा वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने सापळा रचला. सकाळी सव्वा नऊ वाजता…

Read More

मुंबई : मुंबई पोलिस दलातील हवालदार प्रवीण शालीग्राम सुर्यवंशी यांच्या मृत्यूमागील गूढ अखेर उलगडलं आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, प्रवीण यांच्या हत्येमागे त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांचा हात असल्याचं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात प्रतिक्षानगर पोलिस अधिकारी वसाहत, सायन (पूर्व) येथे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. वादाच्या भरात स्मिता आणि प्रतिक यांनी प्रवीण यांना खोलीतील खिडकीच्या काचेवर जोराने ढकलून दिले. या धक्क्यामुळे त्यांच्या हाताच्या नसा खोलवर कापल्या गेल्या तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवीण यांना तात्काळ रुग्णालयात न नेता, उपचार मिळवून न दिल्याने त्यांच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.…

Read More

तुळजापूर | राज्यभरात नवरात्रीच्या उत्साहाची सुरुवात झाली असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. राज्य सरकारने तुळजापूरमधील दोन प्रमुख बसस्थानकांना ऐतिहासिक नावे दिली आहेत. तुळजापूर शहरातील मुख्य बसस्थानकाला आता “श्री तुळजाभवानी बसस्थानक” तर दुसऱ्या बसस्थानकाला “छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक” असे नाव देण्यात आले आहे. या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  भाविकांसाठी 1100 विशेष बससेवा यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल 1100 एसटी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची सोय…

Read More

मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://ladakibahin.maharashtra.gov.in) तांत्रिक अडचणींमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेबसाईट लिंक ओपन न होणे, ओटीपी न येणे, वारंवार एरर दाखविणे अशा समस्यांमुळे अनेक बहिणी नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असून, ठरलेल्या वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास १५०० रुपयांची मासिक आर्थिक मदत थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रक्रिया सोपी करण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तांत्रिक त्रुटींमुळे महिला त्रस्त आहेत,” असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की…

Read More

तुळजापूर │ महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मंदिर परिसरात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.  या अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या साहाय्याने गुन्हेगारांची ओळख पटवणे‌ चोरी, खिसेकापू रोखणे कायदा व सुव्यवस्था राखणे गर्दीचे अचूक नियोजन करणेअधिक सोपे होणार आहे. मंदिर संस्थानने या एआय कॅमेऱ्यांमध्ये परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती अपलोड केली आहे. त्यामुळे गर्दीत असा कोणी आढळल्यास कॅमेरा लगेच अलर्ट देणार असून पोलिसांना त्वरित माहिती मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसर, दर्शन मंडप आणि शहरातील प्रमुख ठिकाणी एकूण १०२ कॅमेरे बसवले गेले आहेत. हे…

Read More

पुणे  संपादक : बापु फुंदे फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारु विक्री करणे, दहशत माजविणे तसेच गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या ९ सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. फुरसुंगी येथील प्रेमलता मुकेश करमावत हिच्यावर ६, तर पंकज मुकेश करमावत याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यातील शेख अहमद उर्फ बबलु सय्यद याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सागर संदिप गुडेकर याच्यावर जबरी चोरी, जीवे मारण्याची धमकी, हत्यार बाळगणे असे ४ गुन्हे दाखल आहेत.…

Read More