वाहन चालविताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना ई-चालान पाठवले जाते. मात्र, अनेक चालक दंडाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करतात. यावर उपाय म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन नियमांमध्ये महत्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. प्रस्तावित नियमानुसार, जर ४५ दिवसांच्या आत ई-चालानची रक्कम भरली नाही तर संबंधित चालक किंवा वाहन मालकांना लायसन्स नूतनीकरण, वाहन नोंदणीसह कोणत्याही आरटीओ सेवेसाठी मंजुरी मिळणार नाही. अशा वाहनधारक व परवानाधारकांना वाहन आणि सारथी पोर्टलवर “व्यवहार करू नये” असे नमूद केले जाईल. कशासाठी होतो ई-चालान? वेगाने वाहन चालवणे नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे सिग्नल तोडणे हेल्मेट न वापरणे इ. याशिवाय, मसुद्यात आणखी काही बदल सुचवले गेले आहेत – ✔ राज्य…
Author: सत्यदिशा न्युज
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 मध्ये तुळजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनन्या अविनाश जाधव हिने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाने विद्यालयासह संपूर्ण परिसर अभिमानाने उजळून निघाला आहे. या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मसुते बसवण्णाप्पा, उपाध्यक्ष श्री. पाटील ज्ञानेश्वर, सचिव श्री. लोंढे यशवंत (आण्णा) व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुहास वडणे, पर्यवेक्षक श्री. मसुते महादेव सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अनन्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. पाटील एल. एस. सर व श्रीमती सावंत एम. एन. मॅडम यांच्या मेहनतीची दखल घेत…
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफीची मागणी धाराशिव — जिल्ह्यातील अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पिळीत सापडले असून सोयाबीन, ऊडीद, कांदा, तूर, ऊस तसेच फळबागांना मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील संबंधित मंत्र्यांना तातडीचे निवेदन पाठवले आहे. पत्रातून मागितले आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खालील स्वरूपात मदत देण्यात यावी: पिकनाशासाठी प्रती हेक्टर ₹50,000/- अनुदान. फळबागांसाठी प्रती हेक्टर ₹2,00,000/- अनुदान. जिल्ह्यात ओला/दुष्काळ जाहीर करावा. सर्वसामान्य कर्जमाफी करावी. सोयाबीनसाठी प्रती हेक्टर ₹6,000/- हमीभाव द्यावा. कापणी प्रयत्नातून शेतकऱ्यांना संपूर्ण विमा हक्क मिळावा. उडिद व कांद्यामुळे…
तुळजापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते मा. दिलीप दादा भोकरे यांची धाराशिव किसान काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या चार दशकांपासून ते काँग्रेस पक्षाशी सक्रियपणे जोडलेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर सातत्याने लढा दिला आहे. पंचायत समिती तुळजापूरच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबवून त्यांच्या अडचणींवर मार्ग काढला आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यांच्या लोकसंग्रहामुळे व कार्यकर्तृत्वामुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड योग्य व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहे. भोकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत…
सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने देशातील अनेक राज्यांत पुरस्थिती निर्माण केली होती. मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंताजनक अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल ११५ टक्के अधिक पाऊस होऊ शकतो. एवढंच नाही तर हा पाऊस गेल्या ५० वर्षांतील विक्रमी पावसाचा रेकॉर्ड मोडू शकतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पाऊस फारसा होत नाही, मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. मान्सून सप्टेंबरमध्ये कमी होतो अशी नेहमीची पद्धत असताना, यावर्षी तो अधिक सक्रिय राहिला. अद्याप अनेक भागांमध्ये आर्द्रता असल्याने ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं …
तुळजापूर (जि. धाराशिव) – शहरातील गजबजलेल्या भागात भरदिवसा मोठी चोरी घडल्याने तुळजापूरात खळबळ उडाली आहे. जहीराबाद (जि. संघारेड्डी, तेलंगणा) येथील सिनियर सिव्हिल जज कविता देवी पर्णचंद्राराव गंटा (वय ४८) यांच्यावर ही चोरी झाली असून तब्बल ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कविता देवी गंटा हॉटेल अशोकमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. दरम्यान, हॉटेलबाहेर उभी असलेली त्यांची महिंद्र एक्सयूव्ही ७०० (क्र. टीएस-२८ एल-६६६६) ही कार अज्ञात चोरट्याने फोडली. गाडीत ठेवलेली ईटकरी बॅग व काळ्या रंगाची हँडबॅग चोरट्याने चोरून नेली. या बॅगमध्ये १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम ३५ हजार…
लातूर – विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सादर करत यश संपादन केले. दिनांक २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे विभागस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. क्वांटम युगाची सुरुवात – संभाव्यता व आव्हाने” या विषयावर धाराशिव जिल्ह्यातील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनन्या अविनाश जाधव (इ. ९ वी) हिने प्रभावी वकृत्व सादरीकरण करून लातूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल लातूर विभागाचे उपसंचालक श्री. मठपती साहेब यांनी तिचा सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच धाराशिव जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सौ. सुधा साळुंके मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्री. तारेक काझी, विज्ञान पर्यवेक्षक श्री. भारत देवगुडे, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर श्री.…
Bheed Crime News | 25 सप्टेंबर हत्याकांड बीड – मित्राचा वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादाने थरारक वळण घेतलं आणि त्यात 22 वर्षीय यश देवेंद्रसिंग ढाका (Yash Dhaka) याचा मृत्यू झाला. गुरुवारी (25 सप्टेंबर) रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला वडिलांनी कवेत घेतलं, ते क्षण पाहून उपस्थित सर्वच जण सुन्न झाले. यश हा बीडचे स्थानिक पत्रकार देवेंद्रसिंग सुरजसिंग ढाका यांचा मुलगा होता. पोलिसांनी आरोपी सूरज काटेला अटक केली असून इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात यश आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. त्याच वैमनस्यातून गुरुवारी पुन्हा भांडण पेटले आणि सूरजने थेट…
नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेवर २०१९ पासून उपचार सुरू होते. मात्र, उपचार करूनही प्रकृतीत काही फरक न पडता तब्बल तीन कोटी रुपये खर्चून गेले, त्यामुळे महिलेच्या मुलाने थेट पोलिस ठाणे गाठले आहे. कुटुंबाकडून दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलेला काही आजाराची लक्षणे दिसली होती. वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू झाले. त्याचदरम्यान पालघरमधील काही व्यक्तींनी “आम्ही आजार बरा करू” अशी हमी दिली आणि त्यांच्या मार्फतच २०१९ पासून उपचार सुरू झाले. मात्र, हे उपचार औषधोपचाराचे होते की मंत्र-तंत्रावर आधारित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तक्रारीनंतर गुन्हा दाखल दरम्यान, लाखो-कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलेच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. यावरून मुलाने…
कुंजीरवाडी (ता. हवेली) – धुमाळ मळा परिसरात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे काशिनाथ शंकर भोंडवे व शिवराम काशिनाथ भोंडवे (रा. गट नं. ३८९, धुमाळ मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत. महावितरणच्या मुळशी विभागातील उपकार्यकारी अभियंता दिप्ती पाटील यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक तपासणीसाठी गेले असता, भोंडवे यांच्या घरातील मीटरचे सील तोडून छेडछाड केल्याचे आढळले. तपासात ग्राहकाने मीटरच्या सर्किटमध्ये रेझिस्टन्स बसवून तब्बल ८७ महिन्यांपासून १३,०२६ युनिटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या चोरीमुळे महावितरणला २,२८,९२१ रुपयांचे नुकसान झाले…