Author: सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

पुणे (प्रतिनिधी):   तुषार काळभोर गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार हडपसर परिसरातील सराईत घरफोड्या आरोपींवर लक्ष ठेवले असताना मोठी कारवाई केली आहे. पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडी करणारा सराईत आरोपी हंसराज उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) आपल्या राहत्या परिसरात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पथक रवाना झाले. सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, आरोपीकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक रिकामी मॅगझीन,…

Read More

इंदापूर (पुणे) – इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी आरोपी जाक्या चव्हाण (राहणार – माळवाडी लिंगाळी, ता. दौंड) याला अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर सहा पथकं तयार करून आरोपीचा शोध सुरु केला होता. तब्बल शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं. घटनेचा तपशील : १० सप्टेंबर रोजी संबंधित महिला प्रवास करत असताना आरोपीने तिला बाईकवर…

Read More

इंदापूर (पुणे) – इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी आरोपी जाक्या चव्हाण (राहणार – माळवाडी लिंगाळी, ता. दौंड) याला अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर सहा पथकं तयार करून आरोपीचा शोध सुरु केला होता. तब्बल शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं. घटनेचा तपशील : १० सप्टेंबर रोजी संबंधित महिला प्रवास…

Read More

सोलापुरातून दोन धक्कादायक आणि थरारक घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असा खोटा दावा करत एका भोंदू बाबाने तब्बल १ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने एका सोसायटीत दरोडा टाकून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. १ कोटी ८७ लाखांची फसवणूक – भोंदू बाबा जेरबंद सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीत गुप्तधन काढून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. कादर शेख याने लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची लूट केल्याचे तपासात समोर आले आहे.…

Read More

कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथे गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. काही हल्लेखोरांनी पहाटे चारच्या सुमारास एका घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पालकांनाही मारहाण करण्यात आली आहे. हल्ल्याची थरारक कहाणी फिर्यादी प्रतीक ऊर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे (वय 28) आणि त्याचा भाऊ सतीश शिंदे हे गुरुवारी पहाटे घरात झोपलेले असताना अचानक आरोपी किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव (दोघे रा. धाकटे वेणगाव), जय सुनिल साबळे (रा. करंजाडे, पनवेल) आणि त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी इसम काळ्या कारने घरासमोर आले. दरवाजा तोडून घरात घुसलेल्या…

Read More

तुळजापुर प्रतिनिधि  :  शाम इंगळे    तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ  येथे घडलेल्या सत्तार यासीन इनामदार खून प्रकरणातील तपासात झालेल्या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुरेश नरवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मार्च महिन्यात झालेल्या या हत्येचा तपास नरवडे यांच्या जबाबदारीवर होता. कायद्यानुसार अटकेनंतर 90 दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र नरवडे यांनी हे दोषारोपपत्र वेळेत सादर केले नाही. या तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मयत सत्तार इनामदार यांच्या कुटुंबीयांनी देखील…

Read More

पुणे | कोंढवा परिसरात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या धडाकेबाज सर्च ऑपरेशनने (Search Operation) राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र पोलीस (ATS), पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून तब्बल 18 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  कारवाईचा तपशील ठिकाण: कोंढवा परिसर, पुणे वेळ: मध्यरात्रीपासून सुरू प्रकार: 18 ठिकाणी एकत्रित छापे सध्याची स्थिती: संशयित चौकशीसाठी ताब्यात कोंढवा परिसर यापूर्वीही दहशतवादी कारवायांमुळे चर्चेत आला होता. दोन वर्षांपूर्वी येथून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे तीन सदस्य पोलिसांच्या ताब्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या भागावर संशयाची सावली पडली आहे. 👮 पोलिसांकडून माहिती या कारवाईबाबत अद्याप…

Read More

पुणे | तब्बल 5 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या जबरी चोरीच्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नं. 96/2021, भा.दं.वि. कलम 392, 34 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी माणिक नागेश सगर उर्फ बबल्या (रा. शिवतेज नगर, हडपसर, पुणे) हा अनेक दिवसांपासून फरार होता. दरम्यान, युनिट 6 चे पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी काळेपडळ रेल्वे बोगद्याजवळ थांबलेला असल्याचे समजले. त्यानंतर पो.हवा. कानिफनाथ कारखेले, पो.हवा. बाळासाहेब सकटे व पो.अं. शेखर काटे यांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ‘बबल्या’ असल्याचे कबूल केले. आरोपीची…

Read More

सोलापूर : सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35(अ) आणि 56 अंतर्गत सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार बँक RBIच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही, तसेच कोणतीही मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करू शकणार नाही. बँकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर देखील मर्यादा आणण्यात आल्या आहेत. तथापि, ठेवीदारांना DICGC योजनेअंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपयांपर्यंत ठेव विमा संरक्षण मिळणार असल्याचे RBIने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, समर्थ सहकारी बँकेनेदेखील यासंदर्भात प्रतिक्रिया देत गेल्या तीन महिन्यांत बँकेने लक्षणीय प्रगती साधल्याचे सांगितले आहे. सभासदांचे भागभांडवल…

Read More