देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडाला तब्बल १३ वर्षांनंतर मंगळवारी नवे वळण मिळाले आहे, जे या प्रकरणाच्या तपासाच्या दिशेलाच हादरवून टाकणारे ठरू शकते. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देताना गंभीर आरोप केले आणि थेट सीबीआयच्या आरोपपत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या न्यायालयात विधीने ठामपणे सांगितले की, तपास यंत्रणांनी तिच्या नावाने जो जबाब सादर केला आहे, तो पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिला अनेक कोरे कागद आणि ईमेलच्या प्रतींवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्या कागदपत्रांचा वापर करून तिचा बनावट जबाब तयार करण्यात आला.…
Author: सत्यदिशा न्युज
मुंबई – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ द्यावा, या मागणीसाठी मराठा आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा अंतिम मसुदा दाखवला व हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं तसेच आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, हे आश्वासन देत आंदोलन यशस्वीरित्या संपवले. मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण विजयी झालो, असे म्हटले. त्यानंतर त्यांना उपोषण मागे घेत मुंबई सोडली. मुंबई व राज्यभरात मराठा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र, त्यांचे आंदोलन खरोखर यशस्वी ठरले…
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केली आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मला तुमच्या माध्यमातून कळाले की, मंत्रिमंडळ बैठकीतून आज छगन भुजबळ यांनी सभा त्याग केला आहे. मी भुजबळांचे स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो. ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संविधानाला धोका होईल, अशाप्रकारचा शासन निर्णय काढण्याचं धाडस केलंय. छगन भुजबळांनी लोकतांत्रिक मार्गाने शासनाला समजावे, याकरिता बैठकीला उपस्थिती न दर्शवणे म्हणजे संविधानिक गांर्भिय त्यांनी दाखवले. संविधानिक मर्यादा त्यांनी सरकारला दाखवल्या. किती जातिवादी झालो आपण, किती? त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्षातील…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रातील राखेचे धोरण निश्चितीसह ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता देण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व निर्णय.. सामाजिक न्याय विभाग: संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार ऊर्जा विभाग: महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित कामगार विभाग:महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा,…
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले. सलग ५ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला. मनोज जरांगे यांच्यापुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान,…