Author: सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

नळदुर्ग | प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेच्या गटनेतृत्व व स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री दत्तात्रय दासकर व उपगटनेतेपदी श्री तानाजी जाधव यांची निवड झाली आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी श्री मारुती खारवे व उपगटनेतेपदी श्री आकाश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर नळदुर्ग नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर पोतदार तसेच लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष श्री प्रवीण धनराज गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नगरसेवक अरविंद बेडगे साहेब यांनी मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी व लोकशाही मूल्ये जपत…

Read More

नळदुर्ग / प्रतिनिधी : राजकीय व सामाजिक बांधिलकी जपणारे, शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित असलेले नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांचा आज वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ॲड. अरविंदजी बेडगे साहेब हे समाजातील सर्वसामान्य घटकांचे प्रश्न मनापासून समजून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्याची कार्यपद्धती अवलंबतात. सामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. कोणतीही जबाबदारी स्वीकारताना ती प्रामाणिकपणे, तळमळीने आणि पारदर्शकपणे पार पाडणे ही त्यांची खास ओळख आहे. नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विकासकामे, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक सहाय्य, तसेच गरजू नागरिकांसाठी विविध मदतीच्या माध्यमातून आपली…

Read More

खुदावाडी (ईश्वरवाडी) पंचायत समिती सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले तसेच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे विश्वासू मानले जाणारे नागनाथ पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नागरिकांच्या अडचणी, प्रश्न व विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. गावभेट दौऱ्यात नागनाथ पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य सुविधा तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक प्रश्नाची नोंद करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. या दौऱ्यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब पाटील दहिटना, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र नागरसे, अण्णा धुमाळ, येडोळा (जकनि तांडा) गावचे सरपंच शिवाजी जाधव,…

Read More

तुळजापूर तालुका बार असोसिएशन (विधिज्ञ संघ) च्या सन 2026 साठी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, उपाध्यक्ष (महिला – राखीव) पदासाठी ॲड. मा. सौ. अंजली साबळे यांची बिनविरोध निवड झाल्याने विधिज्ञ वर्तुळात समाधान व आनंदाचे वातावरण आहे.

Read More

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक तामलवाडी (ता. तुळजापूर) – अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना सांगत असल्याचा राग मनात धरून चुलत्यानेच आपल्या १३ वर्षीय पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तामलवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या खुनाचा तामलवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीस जेरबंद केले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत कदम यांची शेतजमीन आहे. सदर शेत बटईने दत्ता कोरे यांच्याकडे होती. या ठिकाणी ओमकार देविदास कांबळे (रा. कोळसुर, ता. उमरगा) हा आपली भावजयी ज्योती कांबळे…

Read More

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ६ कडून जोरदार कारवाई सुरू असून, दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला ‘बचक्या’ टोळीतील सराईत आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे क्रमांक ३५२/२०२५ व ३५०/२०२५ मधील पाहिजे आरोपी राजेश उर्फ ‘चौपाट्या राजा’ बबलू मंगल मंडळ (वय २९, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरभंगा, बिहार) हा अंगूर वाईन परिसरात थांबल्याची माहिती मिळताच तात्काळ सापळा रचण्यात…

Read More

महाराष्ट्र राज्यभर सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्यात सक्रिय असलेल्या दयावान सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, शिक्षणासाठी मदत तसेच आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना आधार देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. कोणालाही मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांनी स्वेच्छेने संस्थेच्या अधिकृत स्कॅनरद्वारे किंवा थेट संस्थेला भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. लहानशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते, या विश्वासातून दयावान सेवाभावी संस्था कार्यरत आहे. समाजातील दानशूर नागरिक, व्यापारी, तरुण वर्ग तसेच सर्व स्तरातील लोकांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले…

Read More

धारदार शस्त्राचा वापर करून दंगा घडवणे व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-6 कडील पोलीस हवालदार हवा. नीतीन मुंडे  यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 1308/2022 अंतर्गत IPC कलम 143, 147, 148, 149, 427, 504, तसेच आर्म ॲक्ट 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(3) व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 3, 7 अन्वये पाहिजे असलेला आरोपी ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दत्तात्रय उर्फ दत्ता अर्जुन काशिद (वय 34) असून तो अंबरनाथ मंदिराजवळ, तरवडी…

Read More

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि मालट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नुकतेच लग्न झालेलं नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे पांगरीजवळ जांभळबेट पुलावर कारचा चुराडा पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर कारची मालट्रकशी जोरदार धडक झाली. धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून घटनास्थळीच गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. लग्नाला अवघे चार दिवस – नवदम्पत्य गंभीर जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत गौतम कांबळे आणि मेघना अनिकेत कांबळे यांचा 26 नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. देवदर्शनासाठी…

Read More

पुणे (प्रतिनिधी):   तुषार काळभोर गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार हडपसर परिसरातील सराईत घरफोड्या आरोपींवर लक्ष ठेवले असताना मोठी कारवाई केली आहे. पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडी करणारा सराईत आरोपी हंसराज उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) आपल्या राहत्या परिसरात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पथक रवाना झाले. सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, आरोपीकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक रिकामी मॅगझीन,…

Read More