पुण्यातील पोलिसांची मोठी कारवाई
पुणे | फिरोज शेख
गणेशोत्सव काळात दहशत माजविण्याचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. अंमळदारसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरमागे, चाल नं.१३, दत्तवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.काय जप्त झाले?३५,८०० रुपयांचे देशी बनावटीचेपिस्तुल२ जिवंत काडतुसे पोलिसांची माहिती गोपनीय बातमीवरून पोलिसांनी संशयिताला अडवून झडती घेतली असता, त्याच्याकडून पिस्तुल व काडतुसे सापडली. तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोण होते कारवाईत पुढाकार घेणारे अधिकारी?ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनीता हिवरकर यांच्यासह अधिकारी किरण पवार, महेश मंडलिक, प्रकाश मरणजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.विशेष महत्त्व गणेशोत्सव काळात शहरात कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी घेतलेली ही कारवाई नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.
