Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»गुन्हेगार कितीही लपला तरी कायद्याच्या कचाट्यात — पुणे पोलिसांची प्रभावी कारवाई
क्राईम

गुन्हेगार कितीही लपला तरी कायद्याच्या कचाट्यात — पुणे पोलिसांची प्रभावी कारवाई

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजFebruary 22, 2026
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

खंडणी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहराची कारवाई
पुणे : दरोडा, खंडणी व मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यात मागील तब्बल सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे.
मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गोपनीय माहिती संकलन सुरू असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५७१/२०१९, भा.दं.वि. कलम ३९५, ३२९, ४२७, १२० (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ तसेच आर्म अॅक्ट ४(२५) व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ०७ अन्वये दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी स्वामी अनिल कांबळे (वय २५ वर्षे, रा. हिंगणेमळा, हडपसर) हा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून हडपसर परिसरात कारवाई केली. मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने ताब्यात घेतले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, अमोल राऊत, कानिफनाथ कारखेले, रविंद्र रोकडे, गणेश खरात, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, अजिनाथ येडे, पवन भोसले व किरण पड्याळ यांनी संयुक्तरीत्या बजावली.
या अटकेमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून फरार आरोपींवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचा संदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

Post Views: 74
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

गुन्हेगार कितीही लपला तरी कायद्याच्या कचाट्यात — पुणे पोलिसांची प्रभावी कारवाई

February 22, 2026

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group