Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे
ताज्या बातम्या

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजJanuary 9, 2026Updated:January 9, 2026
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

तुळजापूर तालुका बार असोसिएशन (विधिज्ञ संघ) च्या सन 2026 साठी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, उपाध्यक्ष (महिला – राखीव) पदासाठी ॲड. मा. सौ. अंजली साबळे यांची बिनविरोध निवड झाल्याने विधिज्ञ वर्तुळात समाधान व आनंदाचे वातावरण आहे.

तुळजापूर विधिज्ञ संघाच्या निवडणूक समितीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 07 जानेवारी 2026 रोजी मतदार यादी निश्चित करण्यात आली. त्यानंतर दि. 08 व 09 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. महिला उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ॲड. अंजली साबळे यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली.
उर्वरित पदांसाठी दि. 12 जानेवारी 2026 रोजी अर्ज छाननी, तर दि. 13 जानेवारी 2026 रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार असून दि. 17 जानेवारी 2026 रोजी मतदान व मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष (महिला – राखीव), सचिव, सहसचिव व कोषाध्यक्ष या पदांसाठी निवड केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. तानाजी जगताप, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. संजय कपसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून ॲड. बाळाजी देशमाने, मतगणना प्रमुख म्हणून ॲड. सुजित गायकवाड व मतगणना सहाय्यक म्हणून ॲड. हंगरगेकर भाऊ कामकाज पाहणार आहेत.
ॲड. अंजली साबळे या केवळ एक अभ्यासू व अनुभवी विधिज्ञ म्हणूनच नव्हे, तर लिंगायत समाजाच्या तुळजापूर तालुका महिला अध्यक्ष म्हणूनही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तसेच त्या भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, सन 2026 साठी इच्छुक उमेदवार म्हणूनही सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल अनेक ज्येष्ठ वकील, सहकारी व विधिज्ञ बांधवांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यकौशल्याचा व अनुभवाचा लाभ बार असोसिएशनला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 1,024
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

‘चौपाट्या राजा’ पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

January 8, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group