धारदार शस्त्राचा वापर करून दंगा घडवणे व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-6 कडील पोलीस हवालदार हवा. नीतीन मुंडे यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 1308/2022 अंतर्गत IPC कलम 143, 147, 148, 149, 427, 504, तसेच आर्म ॲक्ट 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(3) व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 3, 7 अन्वये पाहिजे असलेला आरोपी ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दत्तात्रय उर्फ दत्ता अर्जुन काशिद (वय 34) असून तो अंबरनाथ मंदिराजवळ, तरवडी रोड, लोणी काळभोर, पुणे येथील रहिवासी आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार हवा. मुंढे व पोलीस हवालदार कारखिले यांनी हडपसर परिसरातून यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वाहिद अ. पठाण, गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
