Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
क्राईम

शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 3, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

 

देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडाला तब्बल १३ वर्षांनंतर मंगळवारी नवे वळण मिळाले आहे, जे या प्रकरणाच्या तपासाच्या दिशेलाच हादरवून टाकणारे ठरू शकते. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देताना गंभीर आरोप केले आणि थेट सीबीआयच्या आरोपपत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या न्यायालयात विधीने ठामपणे सांगितले की, तपास यंत्रणांनी तिच्या नावाने जो जबाब सादर केला आहे, तो पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिला अनेक कोरे कागद आणि ईमेलच्या प्रतींवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्या कागदपत्रांचा वापर करून तिचा बनावट जबाब तयार करण्यात आला.

आईविरुद्ध खोटे आरोप लावण्यासाठी दबाव!

विधी मुखर्जी हिने न्यायालयात आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, तिच्यावर आई इंद्राणी मुखर्जीविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकेच नाही, तर तिने दावा केला की, तिच्या आईच्या अटकेनंतर तिचे वडिलोपार्जित दागिने आणि बँकेत जमा असलेले ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम चोरीला गेली, आणि या सर्वामागे राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जी यांचा मुलगा) आणि रॉबिन मुखर्जी असल्याचा आरोप केला.

Post Views: 0
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group