Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सोलापुरात दोन थरारक घटना; भोंदू बाबाचा पर्दाफाश आणि मध्यरात्री दरोड्याने उडवली खळबळ
ताज्या बातम्या

सोलापुरात दोन थरारक घटना; भोंदू बाबाचा पर्दाफाश आणि मध्यरात्री दरोड्याने उडवली खळबळ

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजOctober 12, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

सोलापुरातून दोन धक्कादायक आणि थरारक घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असा खोटा दावा करत एका भोंदू बाबाने तब्बल १ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने एका सोसायटीत दरोडा टाकून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

१ कोटी ८७ लाखांची फसवणूक – भोंदू बाबा जेरबंद सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीत गुप्तधन काढून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. कादर शेख याने लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची लूट केल्याचे तपासात समोर आले आहे. सोलापुरात अनेकांना फसवणूक करणारा हा भोंदू बाबा कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आला. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले.

लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून दरोडा दरम्यान, दुसऱ्या घटनेत सोलापूर शहरातील अभिषेक नगर, अवंती हौसिंग सोसायटी येथे मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास घडलेल्या दरोड्याने परिसर हादरून गेला आहे.
शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावत घरमालकावर हल्ला केला. या वेळी सोनं आणि रोख रक्कम लुटण्यात आली. यानंतर टोळीने खालील मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसून तसाच दरोडा टाकला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने चोरटे इतर घरे लुटण्यापासून थांबले. ते मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाल  पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच उपायुक्त आश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि गुन्हे शाखेचे पथक पुरावे गोळा करत आहेत. सोलापूर पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दोन दिवसांत सलग घडलेल्या या घटनांनी सोलापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Post Views: 68
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group