वाहन चालविताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना ई-चालान पाठवले जाते. मात्र, अनेक चालक दंडाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करतात. यावर उपाय म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन नियमांमध्ये महत्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत.
प्रस्तावित नियमानुसार, जर ४५ दिवसांच्या आत ई-चालानची रक्कम भरली नाही तर संबंधित चालक किंवा वाहन मालकांना लायसन्स नूतनीकरण, वाहन नोंदणीसह कोणत्याही आरटीओ सेवेसाठी मंजुरी मिळणार नाही.
अशा वाहनधारक व परवानाधारकांना वाहन आणि सारथी पोर्टलवर “व्यवहार करू नये” असे नमूद केले जाईल.
कशासाठी होतो ई-चालान? वेगाने वाहन चालवणे नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे सिग्नल तोडणे हेल्मेट न वापरणे इ. याशिवाय, मसुद्यात आणखी काही बदल सुचवले गेले आहेत –
✔ राज्य सरकारांनी अधिकृत केलेले अधिकारीदेखील ई-चालान जारी करू शकतील
✔ चलान जारी झाल्यानंतर १५ दिवसात प्रत्यक्ष किंवा ३ दिवसांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित करणे बंधनकारक
✔ चलान जारी झाल्यानंतर ४५ दिवसांत हरकत नोंदवली नाही, तर ते स्वीकारले गेले असे मानले जाईल मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नियम मोडणाऱ्यांना दंड टाळता येणार नाही आणि वाहतूक शिस्तीला अधिक बळ मिळणार आहे.
