नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 मध्ये तुळजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनन्या अविनाश जाधव हिने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाने विद्यालयासह संपूर्ण परिसर अभिमानाने उजळून निघाला आहे.
या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मसुते बसवण्णाप्पा, उपाध्यक्ष श्री. पाटील ज्ञानेश्वर, सचिव श्री. लोंढे यशवंत (आण्णा) व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुहास वडणे, पर्यवेक्षक श्री. मसुते महादेव सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अनन्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. पाटील एल. एस. सर व श्रीमती सावंत एम. एन. मॅडम यांच्या मेहनतीची दखल घेत सर्वांनी त्यांचेही कौतुक केले. अनन्याच्या या यशामुळे सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा आणखी बळकट झाली असून आगामी काळात विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.
—
