लातूर – विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सादर करत यश संपादन केले. दिनांक २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे विभागस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. क्वांटम युगाची सुरुवात – संभाव्यता व आव्हाने” या विषयावर धाराशिव जिल्ह्यातील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनन्या अविनाश जाधव (इ. ९ वी) हिने प्रभावी वकृत्व सादरीकरण करून लातूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल लातूर विभागाचे उपसंचालक श्री. मठपती साहेब यांनी तिचा सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच धाराशिव जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सौ. सुधा साळुंके मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्री. तारेक काझी, विज्ञान पर्यवेक्षक श्री. भारत देवगुडे, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर श्री. अर्जुन जाधव, व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्र स्वामी यांनी अनन्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. मसुते बसवण्णाप्पा, उपाध्यक्ष श्री. पाटील ज्ञानेश्वर, सचिव श्री. लोंढे यशवंत (आण्णा) व संचालक मंडळासह विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुहास वडणे सर, पर्यवेक्षक श्री. मसुते महादेव सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अनन्या व तिचे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. पाटील एल.एस. सर व सौ. सावंत एम.एन. मॅडम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
