तुळजापूर | राज्यभरात नवरात्रीच्या उत्साहाची सुरुवात झाली असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. राज्य सरकारने तुळजापूरमधील दोन प्रमुख बसस्थानकांना ऐतिहासिक नावे दिली आहेत.
तुळजापूर शहरातील मुख्य बसस्थानकाला आता “श्री तुळजाभवानी बसस्थानक”
तर दुसऱ्या बसस्थानकाला “छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक” असे नाव देण्यात आले आहे. या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाविकांसाठी 1100 विशेष बससेवा यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल 1100 एसटी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची सोय भाविकांना होणार आहे. 🚍 50 नव्या बसांची भर भाविकांच्या सोयीसाठी यंदा 50 नव्या बसांची भर घालण्यात आली असून या बस तुळजापूर मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे भक्तांना सुखकर, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा आनंद मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना नवसंजीवनी आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एसटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना या सेवेतून उत्साहाची नवी उर्जा मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये लाखो भाविकांचा ओघ सुरू असून, परिवहन महामंडळाचे परिश्रम भाविकांच्या सेवेसाठी नवी “वाहतूक यज्ञसेवा” ठरत आहेत.
