Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»कटावरून पेटला वाद; लातुरात माहिती अधिकार कार्यकर्त्याची क्रूर हत्या, महिला गंभीर जखमी
क्राईम

कटावरून पेटला वाद; लातुरात माहिती अधिकार कार्यकर्त्याची क्रूर हत्या, महिला गंभीर जखमी

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 20, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

लातूर :
कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे भीषण रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. लातूर शहरातील वस्ताद लहुजी साळवे चौकाजवळ बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. बार्शी रोडवरून औसा रोडमार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या इर्टिगा कार चालकाने क्रूझर जीपला कट मारला. याचा राग अनावर झाल्याने क्रूझर चालकाने जीप कारसमोर आडवी लावली. यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळला आणि लाथा-बुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. दरम्यान, क्रूझरमधील एका आरोपीने जवळचा चाकू काढून इर्टिगा कारमधील तरुणावर सपासप वार केले.

तरुण ठार, महिला गंभीर जखमी या हल्ल्यात अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अनमोल हे माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच  सोनाली भोसले (वय 40, रा. अंत्रोली, ता. सोलापूर) यांच्यावरही आरोपींनी चाकूचे वार केले. छाती व पाठीवर गंभीर जखम झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांची धडक कारवाई घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाठलाग करून अहमदपूर येथून 24 वर्षीय एका आरोपीला अटक केली. या गुन्ह्यातील क्रूझर गाडी जप्त करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर, जमादार राहुल सोनकांबळे, जमादार बालाजी कुटवाड आदी करत आहेत. या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

Post Views: 509
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group