Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»थेऊर गावात मजुराला मारहाण; दोघांविरोधात गुन्हा
क्राईम

थेऊर गावात मजुराला मारहाण; दोघांविरोधात गुन्हा

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 18, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

पुणे संपादक बापु फुंदे  लोणी काळभोर, थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात शनिवारी (ता.13) दुपारी प्लॉटिंगमध्ये मजुरी करणाऱ्या कामगाराला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत मजूर गंभीर जखमी झाला असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी मजुराचे नाव सागर शंकर इंगळे (वय 40, रा. काळे वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. तर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे हे प्लॉटिंगमध्ये मजुरी करत असताना समीर व मनिषा पाचोरकर यांनी घटनास्थळी येऊन त्यांना शिवीगाळ केली. “येथे काम करू नकोस” असे सांगत हाताने मारहाण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी इंगळे पळू लागले असता, मनिषा पाचोरकर यांनी त्यांना मागून पकडले. त्यानंतर समीर पाचोरकर यांनी बांबूने त्यांच्या डाव्या हातावर व पायावर वार केले. यात इंगळे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी इंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून समीर व मनिषा पाचोरकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 118(2), 352 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.

Post Views: 25
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group