धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेला नैसर्गिक नरमाधी धबधबा सध्या पावसाळ्याच्या आगमनाने पर्यटकांना मोहून टाकत आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याला भरपूर पाणी मिळाले असून पांढऱ्या फेसाळलेल्या पाण्याचा माऱ्यासह निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. सप्ताहअखेरीस व सुट्टीच्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. किल्ल्याच्या प्राचीन वास्तुकलेसोबतच वाहत्या पाण्याचा गडगडाट आणि हिरव्यागार निसर्गाची सांगड पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देत आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना देखील या पर्यटनामुळे चांगला फायदा होत आहे. प्रशासनाने मात्र पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नळदुर्ग किल्ला आणि नरमाधी धबधबा हे पावसाळ्यात पाहण्यासारखे पर्यटनस्थळ ठरत असून, सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व फोटो व्हायरल होत आहेत.
