Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राजकारण»चार-पाच वर्षे रखडलेल्या निवडणुकांना आता अंतिम मुदत
राजकारण

चार-पाच वर्षे रखडलेल्या निवडणुकांना आता अंतिम मुदत

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 16, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता आयोगाला या मुदतीत निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार-पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे लांबणीवर पडत होत्या. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवत निवडणूक आयोगाला चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कर्मचारी कमतरता, ईव्हीएमची उपलब्धता, सण-समारंभ अशी विविध कारणे पुढे करत आयोगाने मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत मुदतवाढ दिली, मात्र त्याचबरोबर आयोग आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणावरही बोट ठेवले. “चार महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या आयोगाकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसते,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत. तसेच ईव्हीएम, कर्मचारी आदी मागण्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे औपचारिक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

Post Views: 34
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण : २३ मार्च १९९४चा जीआर चर्चेत, पवारांवर टीकेची झोड

September 17, 2025

नाशिकमध्ये शरद पवारांचा सरकारवर आणि मोदींवर हल्लाबोल

September 15, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group