गुवाहाटी :
“देशाची सेवा करायची आहे” असं उत्तर देऊन नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचे वेगळेच कारनामे समोर आले आहेत. आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (ACS) मधील 2019 बॅचची अधिकारी नुपूर बोरा हिच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 2 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या दक्षता पथकाने सोमवारी गुवाहाटीतील तिच्या अधिकृत निवासस्थानावर छापा टाकला. त्यात 90 लाख रोख रक्कम आणि 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने मिळाले. या आकड्यांनी व्हिजिलन्स टीमलाही चकित केले.सहा महिन्यांपासून रडारवर नुपूर बोरा हिच्या हालचालींवर गेल्या सहा महिन्यांपासून देखरेख सुरू होती. बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून काम करताना तिने संशयित लोकांकडून पैसे घेऊन जमिनीशी संबंधित सेटलमेंट केल्याचा आरोप आहे. छापा रविवारीच टाकण्याचा निर्णय होता, पण त्यावेळी नुपूर घरी नसल्याने तो पुढे ढकलण्यात आला. सोमवारी ती परतल्यावर गुवाहाटीतील तिच्या निवासस्थानासह इतर तीन ठिकाणी कारवाई झाली.
“रेट कार्ड” ने केला गोंधळ स्थानिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नुपूर बोरा हिने जमिनीशी संबंधित प्रत्येक सेवेसाठी लाचेखातर ठराविक “रेट कार्ड” ठेवले होते, असा आरोप आहे. जमिनीच्या नकाशासाठी 1,500 रुपये तर नोंदींमध्ये नाव जोडणे/काढणे यासाठी थेट 2 लाख रुपये पर्यंत मागणी केली जात होती. आणखी उघड होण्याची शक्यता व्हिजिलन्सच्या एसपी रोझी कलिता यांनी सांगितले की, जप्त केलेली रोकड आणि दागिने ही फक्त सुरुवात आहे. पुढील तपासात नुपूरच्या भ्रष्ट कारवायांची आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.
