मुंबई :
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे हप्ते थकले असल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती. गणेशोत्सवाच्या तोंडावर पैसे न मिळाल्याने अस्वस्थता वाढली होती. मात्र आता प्रशासनाने महिलांना दिलासा दिला आहे.
👉 दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळून तब्बल 3000 रुपये या महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
26 लाख अर्ज अपात्र
या योजनेत सुरुवातीला 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. पडताळणी प्रक्रियेनंतर पात्र महिलांची संख्या 2 कोटी 44 लाखांवर आली. मात्र, सुमारे 26 लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. स्क्रुटनी प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असल्याने हप्ते वाटपाला उशीर झाला.
बँक खात्यांचा प्रश्न
अनेक महिलांकडे स्वतःचं बँक खाते नसल्याने पैसे त्यांच्या घरातील पुरुष सदस्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रक्रियेत आणखी वेळ लागत आहे.
महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार
जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी जमा झाला होता. पण दोन महिन्यांचा हप्ता थकल्याने महिलांमध्ये चिंता पसरली होती. आता एकत्रित 3000 रुपये खात्यात जमा झाल्यावर महिलांना दिलासा आणि सणासुदीला हाताशी आधार मिळणार आहे.
