Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»तंत्रज्ञान वेगाने बदलले, पण शिक्षकच राहिले खरे मार्गदर्शक
शैक्षणिक

तंत्रज्ञान वेगाने बदलले, पण शिक्षकच राहिले खरे मार्गदर्शक

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 8, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

पुणे | प्रतिनिधी
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. नुकताच हा दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.

पूर्वी शिक्षणाची पद्धत वेगळी होती. शिक्षक बडवून विद्यार्थ्यांना शिस्त लावत, पाढे पाठ करून घेत असत. पण आजच्या काळात कॅल्क्युलेटर, इंटरनेट, यूट्यूब, गुगल आणि चॅट जीपीटी यांसारख्या साधनांमुळे विद्यार्थी त्वरित उत्तरे मिळवू लागले आहेत. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांची व्याख्याच बदलली आहे.

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार झाला आणि पारंपरिक शिक्षणपद्धतीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला. आता कुठलीही शंका असो किंवा गृहपाठ असो, गुगल आणि विविध डिजिटल साधनांमुळे ती सहज सोडवली जाते. त्यामुळे “शिक्षकाची गरज काय?” हा प्रश्न नवीन पिढीच्या मनात निर्माण झाला आहे.

तथापि, विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अद्याप तितकेच आहे. कारण, शिक्षकाकडून मिळणारे ममत्व, जबाबदारीची जाणीव आणि घडवण्याची तळमळ कोणत्याही यंत्रामध्ये येऊ शकत नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा खरा दीपस्तंभ शिक्षकच राहणार, हेच शिक्षक दिनाचे खरे महत्त्व आहे.

Post Views: 67
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण करणे बंधनकारक : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

September 17, 2025

सर्व शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक; २३ नोव्हेंबरला परीक्षा

September 15, 2025

राज्यातील ३४ हजार शिक्षकांना अखेर मिळणार प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

September 12, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group