थेऊर, ता. ७ :
शादी डॉट कॉमवर ओळख करून महिलेला फसवून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एका लॉजमध्ये घडली आहे. हा प्रकार २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, रा. चाकण) याने पतीपासून अलिप्त राहणाऱ्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साइटवर ओळख करून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला एकांतात बोलावून लॉजवर नेले व तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढेच नव्हे तर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकावल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पीडित २५ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांची पथके शोधमोहीम राबवत आहेत.
