नळदुर्ग | प्रतिनिधी
नळदुर्ग नगरपालिकेच्या गटनेतृत्व व स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री दत्तात्रय दासकर व उपगटनेतेपदी श्री तानाजी जाधव यांची निवड झाली आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी श्री मारुती खारवे व उपगटनेतेपदी श्री आकाश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
याचबरोबर नळदुर्ग नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर पोतदार तसेच लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष श्री प्रवीण धनराज गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नगरसेवक अरविंद बेडगे साहेब यांनी मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी व लोकशाही मूल्ये जपत काम करण्यासाठी ही संपूर्ण टीम निश्चितच सकारात्मक योगदान देईल, असा विश्वास अरविंद बेडगे साहेब यांनी व्यक्त केला.
