खुदावाडी (ईश्वरवाडी) पंचायत समिती सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले तसेच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे विश्वासू मानले जाणारे नागनाथ पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नागरिकांच्या अडचणी, प्रश्न व विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
गावभेट दौऱ्यात नागनाथ पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य सुविधा तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक प्रश्नाची नोंद करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.

या दौऱ्यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब पाटील दहिटना, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र नागरसे, अण्णा धुमाळ, येडोळा (जकनि तांडा) गावचे सरपंच शिवाजी जाधव, युवा नेते रमेश जाधव यांच्यासह गावातील लहान-मोठ्या मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीगावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे हीच आपली भूमिका असून, जनतेच्या विश्वासाच्या बळावरच पुढील वाटचाल ठरेल, असा विश्वास नागनाथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या गावभेट दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही आपल्या विविध समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडत नागनाथ पाटील यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
