Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक
क्राईम

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजJanuary 8, 2026
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक
तामलवाडी (ता. तुळजापूर) – अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना सांगत असल्याचा राग मनात धरून चुलत्यानेच आपल्या १३ वर्षीय पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तामलवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या खुनाचा तामलवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीस जेरबंद केले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत कदम यांची शेतजमीन आहे. सदर शेत बटईने दत्ता कोरे यांच्याकडे होती. या ठिकाणी ओमकार देविदास कांबळे (रा. कोळसुर, ता. उमरगा) हा आपली भावजयी ज्योती कांबळे हिच्यासोबत सालगडी म्हणून काम करत होता. त्यांच्यासोबत भावजयीचा १३ वर्षीय मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा देखील राहत होता.
दरम्यान, कृष्णा कांबळे याला चुलता व आईमधील अनैतिक संबंधांची माहिती होती. तो ही बाब वडील सदानंद कांबळे यांना सांगत असल्याने तो आरोपीस अडथळा ठरत होता. याच रागातून आरोपी ओमकार कांबळे याने दिनांक ०१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता साठवण तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णा यास तलावाजवळ नेले. तेथे त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याचा खून केला व मृतदेह तलावाजवळील गवतामध्ये फेकून आरोपी फरार झाला.
दि. ०५ जानेवारी रोजी सदर मृतदेह आढळून आल्यानंतर तामलवाडी पोलिसांनी प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद केली. मयताची ओळख पटवून, गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपी ओमकार देविदास कांबळे यास उमरगा तालुक्यातील कोळसुर गावातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने खुनाची कबुली दिली.
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिनांक ०६ जानेवारी रोजी गु.र.नं. ४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्यासह जुबेर काझी, दिनकर तोग्गी, नितीन भोसले, नजीर बागवान, सुरज नरवडे, उमेश माने, तुराब शेख, हणमंत कोरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

Post Views: 240
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

नाशिक हादरलं: पाथर्डी फाट्याजवळ कोयता, चॉपरने तरुणाची निर्घृण हत्या

September 26, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group