पुणे (प्रतिनिधी): तुषार काळभोर
गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार हडपसर परिसरातील सराईत घरफोड्या आरोपींवर लक्ष ठेवले असताना मोठी कारवाई केली आहे. पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडी करणारा सराईत आरोपी हंसराज उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) आपल्या राहत्या परिसरात आला आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पथक रवाना झाले. सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, आरोपीकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक रिकामी मॅगझीन, एक जिवंत काडतूस (किंमत ₹४१,४००) तसेच १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ₹१७,८१,०००) असा एकूण ₹१८,२२,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९५४/२०२५, भा.ह.का. कलम ३(२५) सह म.पो.का. ३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीचा खालील तीन घरफोडी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे –
१️⃣ सहकारनगर पो.स्टे. गु.र.क्र. २८६/२५
२️⃣ चिखली पो.स्टे. गु.र.क्र. ६१५/२५
३️⃣ भोसरी एमआयडीसी पो.स्टे. गु.र.क्र. ६१०/२५
पुढील तपासासाठी आरोपीला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत स.पो.नि. मदन कांबळे, पो.अं. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, म.पो.अं. प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी सहभाग घेतला.
