Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»इंदापूर तालुक्यातील भिगवण हादरलं — लिफ्ट देऊन महिलेवर अत्याचार करणारा नराधम अखेर तुरुंगात
ताज्या बातम्या

इंदापूर तालुक्यातील भिगवण हादरलं — लिफ्ट देऊन महिलेवर अत्याचार करणारा नराधम अखेर तुरुंगात

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजOctober 19, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

इंदापूर (पुणे) – इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.
महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला.

 

 

 

 

 

या प्रकरणी भिगवण पोलिसांनी आरोपी जाक्या चव्हाण (राहणार – माळवाडी लिंगाळी, ता. दौंड) याला अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर सहा पथकं तयार करून आरोपीचा शोध सुरु केला होता. तब्बल शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं. घटनेचा तपशील : १० सप्टेंबर रोजी संबंधित महिला प्रवास करत असताना आरोपीने तिला बाईकवर लिफ्ट देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र मळद गावाजवळील रेल्वे ब्रिज परिसरात पोहोचल्यावर आरोपीने दुचाकी थांबवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि झाडाझुडपात नेऊन अत्याचार केला.
या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात पोलिसांचे यश : या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपीचा मागोवा घेण्यासाठी सहा विशेष पथकं तयार केली. स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलीस ठाणे आणि दौंड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी समन्वय साधत ही धडक कारवाई केली.
अखेर आरोपी जाक्या कोंडके (चव्हाण) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी : ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश बोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे, पीएसआय रूपेश कदम, पीएसआय अमित पाटील, तसेच पोलिस अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख, महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, कुलदीप संपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करत आहेत.

Post Views: 0
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group