Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तुळजापूर खून प्रकरण : तपासातील हलगर्जीपणामुळे API सुरेश नरवडे निलंबित
ताज्या बातम्या

तुळजापूर खून प्रकरण : तपासातील हलगर्जीपणामुळे API सुरेश नरवडे निलंबित

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजOctober 10, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

तुळजापुर प्रतिनिधि  :  शाम इंगळे    तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ  येथे घडलेल्या सत्तार यासीन इनामदार खून प्रकरणातील तपासात झालेल्या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुरेश नरवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

मार्च महिन्यात झालेल्या या हत्येचा तपास नरवडे यांच्या जबाबदारीवर होता. कायद्यानुसार अटकेनंतर 90 दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र नरवडे यांनी हे दोषारोपपत्र वेळेत सादर केले नाही. या तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मयत सत्तार इनामदार यांच्या कुटुंबीयांनी देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन संताप व्यक्त केला होता.शेवटी तपासातील गंभीर त्रुटी, हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत API सुरेश नरवडे यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Post Views: 30
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group