Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»भरदिवसा तुळजापूरात मोठी चोरी; न्यायाधीशांच्या कारमधून ५ लाख २४ हजारांचा ऐवज गायब
ताज्या बातम्या

भरदिवसा तुळजापूरात मोठी चोरी; न्यायाधीशांच्या कारमधून ५ लाख २४ हजारांचा ऐवज गायब

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 29, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

तुळजापूर (जि. धाराशिव) – शहरातील गजबजलेल्या भागात भरदिवसा मोठी चोरी घडल्याने तुळजापूरात खळबळ उडाली आहे. जहीराबाद (जि. संघारेड्डी, तेलंगणा) येथील सिनियर सिव्हिल जज कविता देवी पर्णचंद्राराव गंटा (वय ४८) यांच्यावर ही चोरी झाली असून तब्बल ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कविता देवी गंटा हॉटेल अशोकमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. दरम्यान, हॉटेलबाहेर उभी असलेली त्यांची महिंद्र एक्सयूव्ही ७०० (क्र. टीएस-२८ एल-६६६६) ही कार अज्ञात चोरट्याने फोडली.

गाडीत ठेवलेली ईटकरी बॅग व काळ्या रंगाची हँडबॅग चोरट्याने चोरून नेली. या बॅगमध्ये १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम ३५ हजार रुपये व नवे कपडे असा एकूण ५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी पंचनामा करून फिर्याद नोंदवली आहे. कविता देवी गंटा यांनी दिलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून तुळजापूर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Post Views: 942
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group