नळदुर्ग;
माननीय माजी नगराध्यक्ष शहाबाज काजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री धीरज भैया पाटील तसेच अरविंद बेडगे साहेबांचे विश्वासू स्वामी उपस्थित राहून काजी साहेबांचा सत्कार करण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमाला नळदुर्ग नगरीचे नगरसेवक इमाम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात काजी साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. काजी साहेबांच्या नेतृत्वगुणांचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
