Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»थेऊर पूरप्रकरण : शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा
क्राईम

थेऊर पूरप्रकरण : शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 18, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

पुणे संपादक: बापु फुंदे
मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे थेऊर परिसरात (ता. हवेली) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतमाल व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण करून पूरस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी : प्रसादराव दत्ताजीराव पाटील दिलीप कुंजीर दत्तात्रय महादेव चव्हाण सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) गोविंद जिवन उत्तमचंदानी राजेश जीवन उत्तमचंदानी (दोघेही रा. सिस्का हाऊस, लोहगाव, पुणे)  या प्रकरणी लोणी काळभोरचे ग्राम महसूल अधिकारी अर्जुन स्वामी यांनी फिर्याद दिली असून, अपर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या तर्फे कारवाई करण्यात आली आहे.

आरोप काय? प्रसादराव पाटील यांनी गट नंबर 63 मध्ये संरक्षण मिल उभारून ओढ्याचे पात्र अरुंद केले. दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाण व सुषमा थोरात यांनी गट नंबर 163 व 164 मध्ये शासनाची परवानगी न घेता ओढा बुजवून अनधिकृत प्लॉटींग केली.गोविंद व राजेश उत्तमचंदानी यांनी गट नंबर 663 मध्ये जमीन खरेदी करून ओढा बुजवून अनधिकृत प्लॉटींग केली.

परिणाम : या सर्व बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन थेऊर फाटा ते कांबळेवस्ती व रुकेवस्ती परिसरात मोठा पूर आला. नागरिकांच्या घरात पाणी शिरले, शेतजमिनी व पिकांचे नुकसान झाले, पशुधन हानीग्रस्त झाले.कायदेशीर कारवाई : आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 270, 125, 324(4), 293, 3(5), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51, 53 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 7 व 15 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.

 

Post Views: 11
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group