Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य»सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोगो अनावरण
राज्य

सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोगो अनावरण

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 17, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

२७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर दरम्यान होणार भव्य आयोजन सोलापूर : ‘सोलापूर सोशल फाउंडेशन’च्या पुढाकाराने येत्या २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनापासून ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत भव्य ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या लक्षवेधी लोगोचे अनावरण नुकतेच सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला जात असून, सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा सर्वांगीण विकास हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार व प्रसार होणार आहे.

‘५-पी’ मार्केटिंग ब्रँडिंगची संकल्पना या महोत्सवाचे स्वरूप खास ‘५-पी’ मार्केटिंग ब्रँडिंग या तत्त्वावर आधारले गेले आहे. यात –

Places (ठिकाणे)

Personalities (व्यक्तिमत्त्वे)

Products (उत्पादने)

Placement (बाजारपेठ)

Pollution Free Environment (प्रदूषणमुक्त वातावरण)

या पाच महत्त्वाच्या घटकांवर महोत्सवाचे आयोजन केंद्रित असेल.

मान्यवरांची उपस्थिती लोगो अनावरण सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटनाला नवे व्यासपीठ या महोत्सवामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवे व्यासपीठ मिळणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. “यातून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता वाढेल. स्थानिक उद्योग, स्वयं-सहायता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, रोजगार निर्मितीला गती मिळेल आणि सोलापूर पर्यटनाचा ब्रँड राज्यभर व देशभर उंचावेल,” असे ते म्हणाले.

 

Post Views: 26
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

एखाद्याचं आयुष्य बदलू शकते तुमचं एक छोटंसं योगदान ! दयावान सेवाभावी संस्थेला मदत करा

December 23, 2025

बार्शी तालुक्यात पांगरीजवळ भीषण अपघात; कार-ट्रकची समोरासमोर धडक

December 1, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group