पुणे :
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गावर नियुक्त असलेल्या आणि वय ५२ वर्षांपर्यंत असलेल्या सर्व शिक्षकांना पुढील दोन वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांवर सक्तीची सेवानिवृत्ती लादली जाणार असल्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेले अनेक शिक्षक या आदेशामुळे चिंतेत आले आहेत. कारण त्या काळी भरती प्रक्रिया डीएडच्या गुणांवर आधारित होती आणि टीईटीची अट नव्हती. तर २०१३ नंतर मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की शिक्षक डीएड किंवा बीएड झालेले आहेत का, यापेक्षा ते कोणत्या वर्गावर शिकवतात हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पहिली ते आठवीवर नियुक्त शिक्षकांसाठीच ही अट लागू राहील. दरम्यान, केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीसाठी देखील आता टीईटी अनिवार्य केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Butterfly सुमारे दीड लाख शिक्षकांचे भवितव्य या निर्णयाशी निगडित असून, राज्य सरकारने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे विविध शिक्षक संघटना आता रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.— महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण “नियुक्ती डीएड किंवा बीएड झालेल्यांची आहे हे महत्त्वाचे नसून वर्ग कोणता यावरच टीईटी बंधनकारक आहे.”
