Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर आत्मसमर्पण
क्राईम

पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर आत्मसमर्पण

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 17, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

 

 

पुणे संपादक; बापु फुंदे – नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर याने मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आंदेकर टोळीचा कुख्यात चेहरा मानला जाणारा कृष्णा आंदेकर हा दिवंगत बंडू आंदेकर याचा मुलगा आणि वनराज आंदेकरचा भाऊ आहे.

काय आहे प्रकरण? आयुष कोमकर याची नाना पेठेत ९ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोमकरवर गोळीबार करून आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेतल्याचे उघड झाले होते. या कटाचा मास्टरमाइंड म्हणून कृष्णा आंदेकरचे नाव पुढे आले होते.

आंदेकर कुटुंबाची पार्श्वभूमी बंडू आंदेकरने पुण्यातील गुन्हेगारी आणि ठेकेदारीवर दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. त्याच्या मुलांनी आणि जावयांनी त्याचे साम्राज्य पुढे चालवले. उदयकांत, लक्ष्मी आणि राजश्री आंदेकर हे नगरसेवक राहिले असून, वनराज आंदेकरने राजकीय पातळीवर आणि टोळीच्या व्यवहारातही मजबूत पकड निर्माण केली होती. त्याच्यामुळे कोमकर बंधूंशी मतभेद तीव्र झाले.

गुन्हेगारीकडे ओढा लहानपणापासूनच गुन्हेगारीकडे आकर्षित असलेल्या कृष्णा आंदेकरने वयाच्या १७ व्या वर्षीच पहिली फायरिंग केली होती. त्यानंतर सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्याशी त्याचे तीव्र वाद सुरू झाले. क्लब ताब्यात घेण्यापासून ते प्रतिस्पर्ध्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत त्याने अनेक कृत्ये केली. २०२३ मध्ये नाना पेठेत निखिल आवाडेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातही कृष्णाचा सहभाग उघड झाला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्याच्यावर लावलेला मोक्का टिकला नाही आणि तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांचा श्वास सोडवला गेल्या काही दिवसांपासून कृष्णा आंदेकर फरार होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त उभारण्यात आला होता. शेवटी मंगळवारी त्याने समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करून पोलिसांचा श्वास सोडवला.

 

Post Views: 0
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026

युनिट ६ च्या पथकाची मोठी कारवाई – मुंढे आणि कारखेले यांची माहिती पोलिसांसाठी ठरली ‘हिट’

November 10, 2025

September 27, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group