आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोकांना अन्न पटकन आणि घाईगडबडीत खावे लागते. जेवणाच्या ताटात जंक फूड नेहमीचे झाले असून, शिळे अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवयही वाढली आहे. मात्र, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्ही शास्त्रांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
🌿 आयुर्वेदाचा इशारा
आयुर्वेद सांगतो की ताजे शिजवलेले अन्न ‘सात्विक’ असते. शिजवल्यानंतर ८ तासांच्या आत खाल्ले तर ते शरीराला ऊर्जा, स्थैर्य आणि ताजेतवानेपणा देते. परंतु त्याच अन्नाचे वारंवार गरम केले तर ते ‘राजसिक’ आणि नंतर ‘तामसिक’ बनते. तामसिक अन्नामुळे शरीरात आळस, थकवा, मानसिक अस्थिरता आणि चिडचिड वाढते.
📚 विज्ञान काय सांगते?
अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, जे लोक ताजे आणि घरगुती अन्न खातात ते अधिक निरोगी राहतात. त्यांना लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्य यांसारख्या समस्या कमी होतात. दुसरीकडे शिळे अन्न खाणाऱ्यांमध्ये पचनशक्ती कमी होणे, शरीरात विषारी पदार्थ साचणे आणि मानसिक तणाव वाढणे दिसून येते.
👦 मुलांवर विशेष परिणाम
वारंवार जंक फूड आणि शिळे अन्न खाणाऱ्या मुलांची एकाग्रता कमी होते. ते लवकर थकतात, रागवतात किंवा दुःखी होतात. यामुळे त्यांचे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील बिघडते.
✅ ताजे अन्न का आवश्यक?
ताजे, सात्विक अन्न शरीराचे चयापचय व्यवस्थित ठेवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मन शांत ठेवते. त्यामुळे जेवण नेहमी वेळेवर, शांत मनाने आणि घरगुती पद्धतीने केलेले असणे आवश्यक आहे.
👉 तज्ज्ञांचा सल्ला:
“आरोग्य टिकवण्यासाठी ताजे घरगुती अन्न खा. शिळे किंवा वारंवार गरम केलेले अन्न टाळा. हेच दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनाचे रहस्य आहे.”
