Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आंध्र-तेलंगणात एसटी आरक्षण, महाराष्ट्रातच बंजाऱ्यांना न्याय का नाही?
ताज्या बातम्या

आंध्र-तेलंगणात एसटी आरक्षण, महाराष्ट्रातच बंजाऱ्यांना न्याय का नाही?

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 8, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्राचा मार्ग खुला झाला. याच गॅझेटचा आधार घेत आता बंजारा समाजानेही आपली आरक्षणाची मागणी उचलून धरली आहे.

सध्या विमुक्त व भटक्या जमाती (व्हीजेएनटी-ए) प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ८ सप्टेंबर रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत धर्मगुरू, महंत, आमदार, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक उपस्थित राहणार असून आंदोलन, कायदेशीर लढाई आणि पुढील रणनीती यावर चर्चा होणार आहे.

बंजारा समाजाचा आक्षेप

हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला “आदिवासी” असा उल्लेख आहे. जर मराठा समाजाला या गॅझेटच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात का समाविष्ट केले जात नाही, असा सवाल समाजाने उपस्थित केला आहे.

आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाला आधीच एसटी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांना अद्याप व्हीजेएनटी (ए) मध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

बंजारा समाजाने सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बीडच्या गेवराई येथे झालेल्या बैठकीत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.
एनसीपीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला असून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले. नांदेडच्या देगलूर येथे तहसीलदारांना निवेदन देत समाजाने आपली मागणी अधिकृतरीत्या नोंदवली आहे.

राज्य सरकारकडून आता यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 0
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group